बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)
आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील …